सिल्लोड, (प्रतिनिधी) : मुंबई येथील आरोग्य भवन, आरोग्यसेवा आयुक्तालय येथे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या अध्यक्षतेखाली सिल्लोड सोयगाव विधानसभा मतदारसंघातील आरोग्य विषयक प्रलंबित प्रश्न व आरोग्य व्यवस्थेच्या बळकटीकरणाबाबत महत्त्वपूर्ण बैठक पार पडली.
या बैठकीत आमदार अब्दुल सत्तार यांनी मतदारसंघातील आरोग्य विभागातील विविध प्रलंबित व अत्यावश्यक प्रश्न मांडले. यावर मंत्री आबिटकर यांनी सकारात्मक तातडीच्या, सामान्य रुग्णांसाठीही वापरण्यास परवानगी देण्याचे निर्देश
आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी १०२ व १०८ आपत्कालीन रुग्णवाहिका सेवांचे प्रभावी नियोजन करण्यावर भर देत, या यंत्रणेतील त्रुटी दूर करण्यासाठी आणि मतदारसंघातील आरोग्य विषयक सर्व अडचणी सोडविण्यासाठी आमदारांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्याच्या स्पष्ट सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.
तसेच आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी १०२ रुग्णवाहिका सेवा केवळ गर्भवती महिलांपुरती मर्यादित न ठेवता, आवश्यकता भासल्यास इतर तातडीच्या व सामान्य रुग्णांसाठीही वापरण्यास परवानगी देण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
भूमिका घेत मतदारसंघातील आरोग्यविषयक समस्या तातडीने मार्गी लावण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश दिले. तसेच १०२ व १०८ या आपत्कालीन रुग्णवाहिका सेवांचे सक्षम नियोजन करण्याबरोबरच आरोग्य विषयक अडचणी सोडविण्यासाठी स्थानिक आमदारांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्याच्या सूचनाही दिल्या.
आमदार अब्दुल सत्तार यांनी सिल्लोड येथील १०० खाटांचे उपजिल्हा रुग्णालय तातडीने सुरू करण्यासाठी पदनिर्मिती, कर्मचारी भरती, फर्निचर व यंत्रसामुग्री उपलब्ध करून देण्याची मागणी केली. तसेच सोयगाव (५० खाट) व अजिंठा येथील रुग्णालयांसाठीही आवश्यक मंजुरी व सुविधा उपलब्ध करण्यावर भर देण्यात आला.
अंधारी, भराडी, अंभई येथे प्राथमिक
आरोग्य केंद्रे कार्यान्वितची मागणी :
तालुक्यातील अंधारी, भराडी व अंभई येथील प्राथमिक आरोग्य केंद्रे पदनिर्मिती अभावी सुरू होऊ शकली नसल्याने ती तातडीने कार्यान्वित करण्याची मागणी करण्यात आली. फर्दापूर, अंभई, अजिंठा, भराडी, गेवराई सेमी, अंधारी येथील आरोग्य केंद्रांमध्ये डॉक्टर व कर्मचाऱ्यांची कमतरता, आवश्यक साधनसामुग्री व सुविधांचा अभाव दूर करण्यासाठी ठोस उपाययोजना करण्यावर भर देण्यात आला. आमठाणा, उंडणगाव, पानवडोद येथील जीर्ण इमारतींच्या जागी नवीन इमारती उभारण्याची मागणी आमदार अब्दुल सत्तार यांनी केली.
सिल्लोड येथे मंजूर ६० खाटांचे स्त्री रुग्णालय तातडीने सुरू करण्याचा मुद्दाही मांडण्यात आला. १०८ रुग्णवाहिका सेवा अपुरी असल्याने अतिरिक्त अॅम्बुलन्स उपलब्ध करून देणे व सोयगाव येथे स्वतंत्र १०८ सेवा सुरू करण्याची मागणी करण्यात आली. फर्दापूर येथे डॉक्टरांसाठी निवास व्यवस्था, उपकेंद्रांना बळकटी, नवीन केंद्रांना मंजुरी तसेच अजिंठा रुग्णालयाची प्रलंबित देयके, संरक्षण भिंत व निधी मंजुरी यासारखे मुद्देही मांडण्यात आले. आपत्कालीन रुग्णांना नॅशनल हॉस्पिटल अँड मेडिकल कॉलेज सिल्लोड येथे रेफर करण्यास परवानगी, तेथे शासकीय योजना लागू करणे, ऑक्सिजन पुरवठा तसेच नवीन उपजिल्हा रुग्णालयासाठी रस्ता मंजुरी याबाबतही चर्चा झाली.
बैठकीला यांची उपस्थिती :
या बैठकीस प्रधान सचिव निपुण विनायक, आयुक्त (आरोग्य) डॉ. सुनील भोकरे, डॉ. कादंबरी बलकवडे, आरोग्य संचालक डॉ. विजय कंधेवाड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अभय धानोरकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. कमलाकर मुतखेडकर, उपसंचालक कांचन वानरे, सहसंचालक डॉ. सुनिता गोलाईत, उपजिल्हा रुग्णालय सिल्लोडचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. महेश विसपुते, डॉ. खंदारे यांच्यासह माजी जि.प. अध्यक्ष श्रीराम महाजन, नगरसेवक विशाल जाधव, गणेश ढोरमारे, सोपान गावंडे आदी उपस्थित होते.












